Email : shivsamarthhapus@gmail.com

Contact : 8055865099 / 9923665522

YouTube

शिवसमर्थ देवगड हापूस

हापूस (अल्फोन्सो ) हा भारतातील आंब्याचा राजा मानला जातो. ते चमकदार पिवळ्या त्वचेसह आकाराने मोठे आहेत. अल्फोन्सोमध्ये मलईदार, समृद्ध, गोड आणि रसाळ चव आणि गुळगुळीत पोत आहे.त्यात तो देवगडच्या कातळात लागवड केलेल्या आबांच्या बागेतील असेल तर त्याची गोडी अधिकच वाढते.मात्र, अलिकडे यामध्ये मोठी फसवणूक वाढली आहे. देवगड परिसरात असलेले वातावरण आणि कातळ ( चिऱ्याचा जांभा दगड) यामध्ये लावलेला हापूस आंबा त्यापासून मिळणारे फळ जसे आहे तसे नैसर्गिक पध्दतीने वाढवून, त्याचे संगोपन करून आणि गवताच्या अडीत पिकून तो आपल्यापर्यंत त्याच्या सर्व गुणधर्मासह पोहोचवण्याच्या हेतूने आम्ही हा शिवसमर्थ देवगड हापूस आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. देवगड हापूस (अल्फोन्सोला) आनंददायी फळांचा वास, फायबर नसलेला, अत्यंत सुगंधी आणि गोड चव यासारखी वैशिष्ट्यपूर्ण आणि अनुकूल वैशिष्ट्ये प्राप्त झाली, जी आपल्यासारख्या असंख्य आंबे खवयांमध्ये लोकप्रिय झाली. हे वेगळेपण देवगडच्या भौगोलिक परिस्थितीवरून आढळते कारण इतरत्र उगवलेल्या इतर जातींमध्ये असेच आढळत नाही. म्हणूनच आम्ही शिवसमर्थ देवगड हापूस च्या माध्यमातून आपल्यासाठी नैसर्गिकरित्या उत्पादित केलेल्या आणि कार्बन विरहित गवताच्या अडीत पिकवलेला, प्रीमियम कॉलिटी चा देवगड हापूस आपल्यासाठी थेट बागेतून घेऊन आलो आहोत. देवगडची गोड चव, घट्ट पल्प आणि अत्यंत आल्हाददायक फळांची चव यासोबतच देवगडची अनोखी चव आम्हीं आपल्याला देत आहेत.त्यामुळे शिवसमर्थ देवगड हापूस नक्कीच आपल्याला आवडेल.

शिवसमर्थ देवगड हापूस

कार्बाइड मुक्त

शिवसमर्थ देवगड हापूस आपल्या ग्राहकांना सेंद्रिय आणि कार्बाइड मुक्त,नैसर्गिकरित्या गवताच्या अडीत पिकवलेला आंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे, आम्ही थेट देवडग येथील आमच्या शेतातून आंबे वितरीत करतो आहोत.

प्रीमियम कॉलिटी

प्रीमियम कॉलिटी दर्जाचा देवगड हाफूस आंबा आमच्याकडून विकत घेण्याचे खूप फायदे आहेत. देवगड हापूस म्हणजे फळांचा राजा. त्यात भारतामध्ये सर्वात उत्कृष्ट आंबा कोकणात (सिंधुदुर्ग जिल्हा, ता: देवगड) येथे पिकवला जातो. इथल्या आंब्याला जगात तोड नाही. आमच्या बागेतून तयार होऊन ग्राहकाकडे येणारा आंबा हा उच्च दर्जाचा व नैसर्गिकरित्या पिकवलेला असणार आहे. देवगड हापूस आंब्याला भारत सरकारचा GI भौगोलिक मानांकन मिळालेले आहे.

कातळातील अस्सल सोनं देवगड हापूस

देवगड हापूस म्हणजे देवगड तालुक्यातील हापूस कलमाचा आंबा त्याची चव ही समतल कातळ ( जांभा दगड )जमीन व समुद्राची खारी हवा व देवगड मधील मात्रु कलम याचा संगम...... कातळ हापूस म्हणजे देवगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ भागात लागवड होणारा हापूस आंबा. या भागातल्या कातळामुळे आंब्याला नवी चव मिळते. देवगड आणि रत्नागिरी येथील हापूस आंबा हा सगळ्यात प्रतिष्ठीत मानला जातो. देवगड हापूस आंब्याला GI टॅग मिळालेले आहे. कातळातील उच्च दर्जाची खनिजे आंब्याला मिळतात. कातळामुळे झाडाला मिळणारा ताण सप्टेंबर, ऑक्टोबरलाच मिळतो व मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते. कातळात लावलेली आंबा कलमे जेव्हा फळे देतात तेव्हा ती त्या कातळाच्या मूळ खनिजे असलेल्या गुणधर्मामुळे अधिकच फायद्याची ठरतात.



Descriptive Image

देवगड हापूस आंबा कसा ओळखावा ?

१) 9167668899 या whatsapp नंबर वर आंब्याचा कोड सहित फोटो पाठवा
२) काळा पार्ट काढून त्यातील डिजिट नंबर वरील watsapp वर पाठवा, तुम्हाला पुढील माहिती दिसेल.
Name :- Shri.Rahul Ramchandra Shewale
Authorised User No: - AU/43200/GI/139/1900
हे दिसले तरच ओळखावे कि हा देवगड हापूसच आहे .

अभिप्राय

संपर्क करा

शेवाळे अ‍ॅग्रो फार्म

गट नंबर ७१/३/२, मु. पो. नाऱिंगे,
ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग 416630


संपर्क

📱 8055865099
📞 9923665522


ऑफिस

पुणे-सोलापुर रोड, शेवाळेवाडी फाटा,
मु. मांजरी बुद्रुक, पो. मांजरी फार्म,
ता. हवेली, जि. पुणे 412307